*कोकण Express*
*पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे भरा – जि.प. माजी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षकांच्या एकुण ८६ मंजूर पदापैकी ३८ पदे रिक्त असल्याने पशुधन लशिकरण,व संवर्धन यावर परिणाम होत आहे. तरी ही पदे तात्काळ भरण्यात यावीत.अशी मागणी माजी जि प उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पशुसवर्धन दुग्धविकास, क्रीड़ा मंत्री सुनील केदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागात मोठ्या प्रमाणात पशुधन विकास अधिकारी व पशुधन पर्यवेक्षक यांची रिक्त पदे आहेत. रिक्त पदांमुळे पशुधनावर वेळीच उपचार होत नाहीत .काही वेळा उपचाराअभावी जनावरे दगावल्याच्या घटना घडल्या आहेत. अपु-या अधिकारी , कर्मचारी संख्येमुळे काम करणाऱ्या या विभागातील अधिकारी,कर्मचारी यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत आहे. यावर वेळीच उपाय योजना न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. रिक्त पदांमुळे लसीकरण, विविध योजना राबविताना खूपच अडचणी निर्माण होत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील पशुधन विकास अधिकारी, पशुधन पर्यवेक्षक संवर्गातील रिक्त पदांची संख्या मोठी आहे. यामध्ये
पशुधन विकास अधिकारी २५ मंजूर पदापैकी १२ भरली असून १३ रिक्त, (५२ टक्के) आहेत.
पशुधन पर्यवेक्षक ६१ मंजूर पदापैकी ३६ भरली असून २५ पदे (४१ टक्के) रिक्त आहेत.अशी एकुण ८६ मंजूर पदापैकी ३८ पदे रिक्त आहेत.
तरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषदेअंतर्गत पशुधन विकास अधिकारी यांची रिक्त पदे भरण्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी. तसेच पशुधन पर्यवेक्षकांची रिक्त पदे भरण्यास परवानगी देण्याबाबत संबंधित विभागास आदेश द्यावेत. अशी विनंती माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पशुसवर्धन दुग्धविकस मंत्री सुनील केदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.