*कोकण Express*
*‘ब्लु फ्लॅग बीच’ ही संकल्पना महाराष्ट्रात राबवली जाणार !*
*सिंधुदुर्गात पर्यटन वाढीच्या दृष्टीने काम सुरू ; पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे*
*खा.विनायक राऊत, ना.उदय सामंत,आ. वैभव नाईक ,आ.दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेनेच्या वतीने ना.आदित्य ठाकरे यांचे जंगी स्वागत*
छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपल्यासाठी मंदिरे आहेत, प्रेरणास्थान आहेत. किल्ल्यांचे संवर्धन करत हा वारसा सांभाळत पुढे नेत पर्यटन वाढीच्या दृष्टीनेही खूप मोठे काम सुरू आहे. महाराष्ट्रात ‘ब्लु फ्लॅग बीच’ ही संकल्पनाही राबवली जाणार आहे. सिंधुदुर्गात ही संकल्पना चांगल्या प्रकारे आणू शकतो. अशी माहिती राज्याचे पर्यटन व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मालवण येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
सिंधुदुर्गात पर्यटन वाढवण्यासाठी स्कोप आहे. त्यावर फोकस करून स्थानिक स्वराज्य संस्था, आमदार, खासदार या सर्वांना एकत्र करून पर्यटन वाढीच्या दृष्टीने काम सुरू आहे. बीच ब्लु फ्लॅग स्टेटस मिळवण्यासाठी प्रयत्न असून होम स्टे ऍग्रो टुरिझम पॉलिसी यावरही काम सुरू असल्याचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले.
पर्यटन मंत्री ना.आदित्य ठाकरे यांनी आज मालवण येथून ३ दिवसीय कोकण दौऱ्यास सुरुवात केली. यावेळी खासदार विनायक राऊत ,पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक ,आमदार दीपक केसरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मालवण शिवसेनेच्या वतीने त्यांना पुष्पहार घालून जंगी स्वागत करण्यात आला.
नव्या बंदर जेटी येथून किनारपट्टी व पर्यटनाबाबत माहिती घेतली. मालवण नगरपालिकेच्या प्रस्तावित मत्स्यालय प्रकल्पाचे सादरीकरण पहाणीही करण्यात आली. यावेळी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, आमदार वैभव नाईक, सिंधुरत्न योजना अध्यक्ष आमदार दीपक केसरकर, शिवसेना सिंधुदुर्ग संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, शहरप्रमुख बाबी जोगी, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, नितीन वाळके, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, पंकज सादये, नागेंद्र परब, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पंकज वर्दम, तालुकाप्रमुख मंदार गावडे, अमित भोगले, शहरप्रमुख मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, अमेय देसाई, किरण वाळके, संमेश परब, अक्षय रेवंडकर, पिंटू गावकर, आतू फर्नांडिस, किसन मांजरेकर, स्वप्नील आचरेकर, मंगेश सावंत, मनोज मोंडकर, भाई कासवकर, प्रसाद आडवनकर, यशवंत गावकर, सेजल परब, दिपा शिंदे, आकांक्षा शिरपुटे, पूजा तळाशीलकर, किशोर गावकर यासह प्रशासकीय अधिकारी तहसीलदार अजय पाटणे, मुख्याधिकारी संतोष जिरगे, पोलीस निरीक्षक एस एस ओटवणेकर, बंदर निरीक्षक सुषमा कुमठेकर, अमोल ताम्हणकर, मत्स्य अधिकारी मालवणकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, शिवसेनेचे आजी माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी ना. ठाकरे यांनी बंदर जेटीची पाहणी केली. यानंतर मालवण नगरपरिषद क्षेत्रात उभारण्यात येणाऱ्या मत्स्यालय व जैवविविधता माहिती केंद्राचे सादरीकरण मुख्याधिकारी संतोष जिरगे यांनी केले. माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनीही याबाबत पर्यटन मंत्र्यांना माहिती दिली.
यावेळी पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, मालवणात येणाऱ्या पर्यटकांसाठी अधिक सुरक्षेच्या दृष्टीने नवीन सुसज्ज जेटी उभारण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटनवाढीसाठी मोठा वाव असून राज्य शासनाने येथील पर्यटन विकासावर अधिक लक्ष केंद्रित केले आहे. येथील स्थानिक आमदार, खासदारांच्या माध्यमातून पर्यटन विकासाचे काम अधिक जलद गतीने करण्यात येईल. मालवण नगरपरिषदेच्या वतीने या ठिकाणी मत्स्यालय उभारणी केली जात आहे.
सिंधुदुर्गातील प्रत्येक तालुक्यात पंचतारांकित हॉटेलसाठी प्रयत्न सुरू असून त्याबाबत काही ठिकाणी प्रस्तावही प्राप्त झाले आहेत. टुरिझम पॉलिसी अंतर्गत हॉटेल साठी लागणाऱ्या आवश्यक ८० परवानग्यांची संख्या आता १० वर आणण्यात आली आहे. पर्यटन विकास अधिक गतिमान करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असेही मंत्री ठाकरे म्हणाले.