*युवा संदेशच्या माध्यमातून 1 लाख वह्या वाटप करणार:गोट्या सावंत*

*युवा संदेशच्या माध्यमातून 1 लाख वह्या वाटप करणार:गोट्या सावंत*

*कोकण Express*

*युवा संदेशच्या माध्यमातून 1 लाख वह्या वाटप करणार:गोट्या सावंत*

*टॅलेंट सर्च परीक्षेसाठी ५२०० विद्यार्थी सहभागी*

*कणकवली ः प्रतिनिधी*

युवा संदेश प्रतिष्ठानच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वह्या वाटण्यात येणार आहेत पालघर येथील एका दानशूर मित्राने प्रतिष्ठानचे कार्य पाहून एक लाख वह्या दिल्या आहेत . त्याचे वाटप जूनपासून करण्यात येईल . एसटीएस परीक्षा एकाच दिवशी एकाच वेळी यशस्वी करण्यामागे सर्व शिक्षक संघटना यांचे मोठे सहकार्य राहिले आहे जिल्हा बँकेच्या माध्यमातून मिळणारे शैक्षणिक कर्ज सोसायट्यांच्या माध्यमातूनही सहजपणे उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे तसे झाले तर विद्यार्थ्यांना शिक्षणाच्याबाबतीत अडचणी येणार नाहीत . यासाठी सर्व संचालकांनी प्रयत्न करावेत , अशी अपेक्षा माजी जि प अध्यक्ष संदेश उर्फ गोटया सावंत यांनी येथे व्यक्त केली . युवा संदेश प्रतिष्ठानच्या एसटीएस परीक्षेचे उद्घाटन येथील विद्यामंदिर हायस्कूलच्या सभागृहात संपन्न झाले .

यावेळी श्री . सावंत बोलत होते . व्यासपिठावर माजी जि . प . अध्यक्षा तथा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ संजना सावंत , जिल्हा बँकेच्या संचालिका सौ . प्रज्ञा ढवण संचालक समीर सावंत उद्योजक किरण गावकर , केंद्रप्रमुख संतोष जाधव , शिक्षक नेते गिल्बर्ट फर्नांडिस , अच्युत वणवे , पत्रकार विरेंद्र चिंदरकर आदी उपस्थित होते . संदेश सावंत म्हणाले , शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर चौथी ते सातवीपर्यंतच्या मराठी सेमी इंग्रजी , इंग्रजी माध्यमातून एसटीएस परीक्षेला जिल्हाभरात विविध ठिकाणच्या १७ केंद्रांवर सुमारे ५ हजार २०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत . सौ ढवण म्हणाले आमच्या काळात अशा स्पर्धा परीक्षा होत नव्हत्या . मात्र आता संदेश सावंत व संजना सावंत या दाम्पत्याने विद्यार्थ्यासाठी एसटीएससारख्या परीक्षा आयोजित करून चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे . या संधीचा लाभ घ्यावा , समीर सावंत यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने जुनी आठवण सांगताना भिरवंडेच्या तत्कालीन खासदार ब्रि . सुधीर सावंत यांनी माझे वडील कै . रमाकांत सावंत यांचा याच सभागृहात सत्कार केला होता . आज भिरवंडेच्याच संदेश सावंत यांनी माझा याच सभागृहात सत्कार केला . त्यामुळे आज आनंद होत आहे . कार्यक्रमात जिल्हा बँकेचे नूतन संचालक प्रज्ञा ढवण , समीर सावंत यांचा तसेच उद्योजक किरण गांवकर यांचा सत्कार करण्यात आला . प्रास्ताविक , सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन परीक्षाप्रमुख सुशांत मर्गज यांनी केले कार्यक्रमाला उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!