प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

*कोकण Express*

*प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची जिल्हा कार्यकारिणी जाहीर*

*अध्यक्षपदी संजना ठाकूर, सरचिटणीस सीमा पंडित, उपसरचिटणीस गौरी वेर्लेकर,कार्याध्यक्ष स्नेहल राजम, कोषाध्यक्षपदी स्वाती हिंदळेकर*

*ओरोस ः  प्रतिनिधी*

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गची नवनियुक्त जंबो जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. अध्यक्षपदी संजना ठाकूर, सरचिटणीस पदी सीमा पंडित, उपसरचिटणीस पदी गौरी वेर्लेकर, कार्याध्यक्ष पदी स्नेहल राजम कोषाध्यक्ष पदी स्वाती हिंदळेकर यांची निवड करण्यात आली.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ सिंधुदुर्ग व अखिल संघ महिला सेल यांची संयुक्त विशेष सभा शनिवार 26 मार्च 2022 रोजी जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सल्लागार प्रकाश दळवी, राज्य कोषाध्यक्ष विनयश्री पेडणेकर, राज्य संयुक्त चिटणीस म ल देसाई, व प्रशांत पारकर, माजी राष्ट्रीय प्रतिनिधी मृगाली पालव यांचे प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. यावेळी जिल्ह्यातील सर्व जिल्हा कार्यकारणी पदाधिकारी, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव व सर्व तालुक्यांचे महिला सेल अध्यक्ष, सचिव व मोठ्या संख्येने अखिल संघटक उपस्थित होते.
अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ ही विशाल संघटना असून ती जागतीक महासंघाशी जोडलेली एकमेव संघटना आहे. या संघटनेच्या माध्यमातून महिला शिक्षिकांना अनेक लाभ मिळवून दिलेले आहेत. महिलांना नोकरी करीत असताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. महिलांच्या हक्कासाठी राष्ट्र, राज्य व तळगाळात झटणारी संघटना असा संघटनेचा नावलौकिक आहे. राष्ट्रीय महिला सेलच्या प्रतिनिधी कै . सुलभाताई दोंदे यांचे नेतृत्वाखाली सर्व स्तरावर स्वतंत्र महिला सेल निर्माण करून महिलांसाठी स्वतंत्र हक्काचे व्यासपीठ संघटनेने निर्माण केलेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ महिला सेल सिंधुदुर्गच्या नवीन कार्यकारीणीची निवड या सभेत करण्यात आली.

या नवीन कार्यकारिणीच्या उपाध्यक्ष पदी स्नेहा सावंत, शुभांगी आचरेकर, प्रतीक्षा जाधव, श्रुती पालांडे, मयुरी करलकर, मयुरी येरम, अर्चना देसाई, अक्षता राणे यांची तर संयुक्त चिटणीस म्हणून प्रेरणा वारंग, श्रेया परब, प्राजक्ता तिरलोटकर, मानसी मेस्त्री, वैभवी नाटेकर, उमा कासार, संध्या शेळके, प्रीतम पारकर यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा संघटक समृध्दी म्हाडगुत, ज्योत्स्ना पाटील, रचना गव्हाणकर, संगीता शेळके, मनीषा ठाकूर, वैष्णवी केळुसकर, रश्मी नेरूरकर, शुभेच्छा गवस, दिपाली कळणेकर, वासंती झोरे, ऋतुजा गवस यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा सेल सदस्य म्हणून अंकिता बेळेकर, दिप्ती जाधव, दिपाली सावंत, मृणालिनी आचरेकर, सुनंदा कवठणकर, वर्षाराणी कर्ले, प्राप्ती राणे, पूनम कदम, सारीका सासणे, दिपमाला माने, जयश्री यादव, विद्याताई पाटील, सुप्रिया गोसावी, अनिता कांबळी यांची निवड करण्यात आली आहे.

राज्य सल्लागार प्रकाश दळवी यांच्यासह उपस्थित सर्व राज्य संघ पदाधिकारी यांनी संघटनात्मक मार्गदर्शन केले .नवनियुक्त महिला सेल अध्यक्ष संजना ठाकूर व सचिव सीमा पंडित यांनी आपल्या मनोगतातून आपल्याला लाभलेल्या सुवर्णसंधीचा शिक्षक भगिनींसाठी पुरेपुर उपयोग करण्याचा प्रयत्न करू असे विचार व्यक्त केले. जिल्हाध्यक्ष राजा कविटकर यांनी जिल्हा महिला सेलचे जिल्हा कार्यकारीणीच्यावतीने अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. बरोबरीने काम करीत असताना खेडयापाड्यात सेवा करणाऱ्या आपल्या भगिनींना साथ देणे म्हणजेच संघटनेचे काम आहे . तो वसा आपण प्रत्येकाने प्रामाणिकपणे निभावण्याचा प्रयत्न करू असे आवाहन केले . या कार्यक्रमासाठी राज्य कोषाध्यक्षा विनयश्री पेडणेकर, मृगाली पालव, पूनम पालव, श्रावणी सावंत व सर्व तालुका महिला सेल यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन व संयोजन जिल्हा सरचिटणीस बाबाजी झेंडे व उपसरचिटणीस भिवा सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!