माणगावात आ. वैभव नाईक चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते उद्घाटन

माणगावात आ. वैभव नाईक चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते उद्घाटन

*कोकण  Express*

*माणगावात आ. वैभव नाईक चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते उद्घाटन*

*आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन*

कुडाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त माणगांव बाजार येथील मैदानावर युवक कल्याण संघ व शिवसेना माणगांव आयोजित आ. वैभव नाईक चषक भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते उत्साहात पार पडले.या स्पर्धेला कबड्डी रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुका प्रमुख राजन नाईक, कुडाळ शहरप्रमुख तथा नगरसेवक संतोष शिरसाट, उपतालुका प्रमुख कुष्णा धुरी, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, सचिन काळप, नगरसेवक किरण शिंदे, उदय मांजरेकर, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अतुल बंगे, माजी उपसभापती श्रेया परब, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हणेकर,सिंधुदुर्ग फेडरेशनचे कार्यवाह दिनेश चव्हाण, उदयकुमार साळुखे, अवधुत मालवणकर, बाबी गुरव, रामा धुरी, बाबा परब आदी उपस्थित होते. पंच म्हणून नितीन हडकर, प्रीतम वालावकर व किशोर पाताडे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!