*कोकण Express*
*महालक्ष्मी प्लाझा येथील मांगल्य दर्पण ब्युटीपार्लरला लागली आग….*

*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली विद्यामंदिर हायस्कुल नजीक असलेल्या महालक्ष्मी प्लाझा येथील मांगल्य दर्पण ब्युटीपार्लर या दुकानाला देवाजवळ असलेल्या दिव्यामुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत असून यामध्ये कपडे व इतर साहित्य जळून मोठे नुकसान झाले आहे. ही घटना १० वा.सुमारास घडली.
दरम्यान, दुकानाची काचे फुटत असल्याचा आवाज आल्याने शेजारी राहत असलेल्या म्हापसेकर यांना ही बाब लक्षात येताच तेथील नागरिकांनी सदर दुकानाचे कुलूप फोडत कणकवली न.प.च्या अग्निशामक बंबाव्दारे आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. न.प.च्या शेजारीच ही आग लागल्याने अवघ्या १० मी. बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे.
ही घटना कळताच नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक रुपेश नार्वेकर, अण्णा कोदे, संजय कामतेकर, अबीद नाईक, राजेंद्र म्हापसेकर, दीपक बेलवलकर, तन्मय नार्वेकर, हृतिक नलावडे, कन्हैया पारकर, सर्वेश शिरसाट, विशाल डामरी, गौरव हर्णे, गणेश तळगावकर, तसेच न.प.कर्मचारी मनोज धुमाळे, रोहन डिचोलकर,विनोद जाधव आदी उपस्थित होते
