*कोकण Express*
*भाजपा वेंगुर्ले च्या वतीने ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” अंतर्गत सुदरुढ मुलांना प्रमाणपत्राचे वाटप*
*वेंगुर्ले नगरपरिषद हद्दीतील तीन अंगणवाडीतील सुदरुढ बालकांना शिवाजी प्रागतिक शाळा ,कॅम्प येथे प्रमाणपत्र वितरण*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या महत्त्वाकांक्षी संकल्पनेतून व महाराष्ट्राचे लोकनेते मा. देवेन्द्र फडणवीस विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र राज्य, मा.चंद्रकांत पाटील प्रदेशाध्यक्ष भाजप महाराष्ट्र प्रदेश यांच्या नेतृत्वात ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” संपूर्ण राज्यात दिनांक 21 मार्च ते 27 मार्च 2022 या दरम्यान जिल्ह्याच्या व मंडलाच्या अंगणवाडी व बुथ स्तरावर यशस्वीपणे राबवायचे असल्याने त्याचा शुभारंभ कुडाळ येथे जिल्हाध्यक्ष राजन तेली व वैद्यकीय आघाडीचे प्रदेश सहसंयोजक डाॅ अमेय देसाई यांच्या उपस्थितीत संपंन्न झाला.
खरतर केंद्र सरकारने राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियान अंतर्गत ” स्वस्थ बालक बालिका अभियान ” हे संपूर्ण देशात २१ मार्च ते २७ मार्च या कालावधीत आयोजित करावे असे सर्व राज्याला कळवीले होते , परंतु महाराष्ट्रात राज्य सरकारने कोरोना चे कारण सांगून अभियानच रद्द केले . म्हणूनच सदर अभियान भाजपा च्या वतीने घेण्यात आले असे जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई यांनी सांगितले .
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य शरदजी चव्हाण म्हणाले की ० ते ६ वर्षा मधील मुलांची उंची, वजन व वय या निकषांवर स्वस्थ बालकांना प्रमाणपत्र व ‘POSHAN APP’ द्वारे नोंद केली जाणार आहे . जेणेकरून कुपोषित बालकांना केंद्र सरकार कडून सकस आहार पुरविण्यासाठी मदत होईल .
यावेळी या कार्यक्रमाला माजी मुख्याध्यापक एस्. एस्. काळे सर , शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष संतोष जगताप , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर व प्रशांत खानोलकर , जिल्हा उपाध्यक्ष अॅड. सुषमा खानोलकर , महिला ता.अध्यक्षा स्मिता दामले , रविंद्र शिरसाठ , महिला मोर्चा च्या व्रुंदा गवंडळकर व आकांक्षा परब , हळदणकर , युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर , भुषण जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
तसेच *अंगणवाडी सेविका* स्मिता कोनेकर – सुनीता कांबळे – नयना आरेकर तसेच *पालक* – पुजा सावंत , रुचीरा दाटेकर , तृप्ती माणगांवकर , नेहा गवस , दर्शना मोरजकर , गजानन वेर्णेकर , आचल डांगरेजा , गायत्री जगताप , मंजिरी मोरे , माधवी जगताप , प्रणाली पार्सेकर , साधना मिसाळ इत्यादी उपस्थित होते .