*कोकण Express*
*आ. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त महिला बचत गटांना खुर्च्या, कपाट वाटप*
*युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सौजन्याने युवा सेनेच्या वतीने वाटप..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसेनेचे आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्या सौजन्याने युवा सेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत कणकवली शहरातील माऊली वस्तीस्तर संघ पोयेकरवाडी, कनकसिंधु शहरस्तर संघ यांना बैठक व्यवस्थेसाठी 50 खुर्च्या आणि लोखंडी कपाट चे मोफत वाटप करण्यात आले. एकूण 20 बचतगटाच्या महिलांना याचा फायदा होणार आहे. महिलांचे सक्षमीकरण व्हावे यासाठी बचतगटाच्या माध्यमातून महिला संघटित होत विविध प्रश्न आणि समस्यांवर विचारविनिमय करण्यासाठी बैठकांचे आयोजन करतात. मात्र अशा बैठकांवेळी बैठक व्यवस्थेअभावी महिलांना सतरंजी अथवा चटईवर बसून चर्चा करावी लागत असे.महिला बचतगटांना बैठक व्यवस्थेसाठी खुर्च्या आणि कागदपत्रे व तत्सम सामान ठेवण्यासाठी लोखंडी कपाट मिळावे यासाठी माऊली वस्तीस्तर संघ अध्यक्षा दिव्या साळगावकर यांनी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्याकडे मागणी केली होती.त्यानुसार लागलीच सुशांत नाईक यांनी युवा सेनेच्या वतीने 50 खुर्च्या आणि लोखंडी कपाट उपलब्ध करून दिले. महिला भगिनींची बैठक व्यवस्थेची गैरसोय दूर करत खुर्च्या आणि कपाट दिल्याबद्दल दिव्या साळगावकर आणि बचतगटाच्या उपस्थित महिला प्रतिनिधींनी आभार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, नगरसेविका माही परुळेकर, मानसी मुंज, उपजिल्हाप्रमुख सुजित जाधव, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवा सेना तालुकाप्रमुख ललित घाडीगांवकर, युवा सेना शहरप्रमुख आदित्य सापळे, विभागप्रमुख सिद्धेश राणे, सचिन आचरेकर, शिवसेना कणकवली महिला शहरप्रमुख साक्षी आमडोसकर, रोहिणी मलये, सिद्धी शेट्ये, लक्ष्मी गुरव, संगीत सारंग, अर्पिता बुचडे, सुचिता सोनी आदी उपस्थित होते.