स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूलच्या मुलांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश

स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूलच्या मुलांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश

*कोकण  Express*

*स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूलच्या मुलांचे विविध स्पर्धांमध्ये सुयश*

*कासार्डे ः  संजय भोसले*

कांगारू ऑल इंडिया आर्ट या संस्थेमार्फत जानेवारी महिन्यात विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. सम्पूर्ण भारतामधील विद्यार्थी या स्पर्ध्येत सहभागी झाले होते. या स्पर्ध्येत तळेरे येथील स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूलच्या मुलांनी घवघवीत यश प्राप्त केले. याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे.

या स्पर्धेतील शिझा रहीम मुकादम (Sr.KG), आहिल तौफिक बागेवाडी (Sr.KG), प्रतीक संतोष राठोड (8 वी), पालवी विजय शेणवी (7 वी), सिया जयेश सावंत (4 थी), स्नेहा विठ्ठल येडगे (1 ली), सानिया प्रकाश आंबेरकर (9 वी), आशिषकुमार चेणाराम गेहलोत (9 वी), आर्यन नितीन धायगुडे (2 री) यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना भगवान जाधव, विशाल आडिवरेकर व इतर सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. स्वीटलँड कॉन्व्हेंट स्कूल,तळेरे प्रशालेच्या अध्यक्षा केतकी रविंद्र तावडे, मॅनेजर प्रकाश आंबेरकर, मुख्याध्यापक भगवान जाधव, शिक्षक व शिक्षकेत्तर सर्व कर्मचारी यांनी सर्व मुलांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!