बहुजन साहित्य-कला-संस्कृती संमेलनाच्या आढावा बैठकीचे आयोजन

बहुजन साहित्य-कला-संस्कृती संमेलनाच्या आढावा बैठकीचे आयोजन

*कोकण Express*

*बहुजन साहित्य-कला-संस्कृती संमेलनाच्या आढावा बैठकीचे आयोजन*

*कासार्डे ः  संजय भोसले*

दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दलित आदिवासी-भटके विमुक्त-कष्टकरी-बहुजनाच्या मुक्तीवादी राजकारणाच्या बाजूने सांस्कृतिक हस्तक्षेप करण्यासाठी सावंतवाडी येथे बहुजन साहित्य संमेलन आयोजित करण्याचा निर्णय मागील आठवड्यात संपन्न झालेल्या बैठकीत करण्यात आला आहे. ७,८ मे २०२२ ह्या संमेलनाच्या तारखा निश्चित करण्यात आल्या आहेत.

संमेलनाच्या पुढील तयारीसाठी सिंधुदुर्ग, गोवा व दक्षिण कोल्हापूर या विभागातील परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्ते, अभ्यासक, साहित्यिक व कलावंतांची व्यापक बैठक संयोजन समितीचे अध्यक्ष संपत देसाई यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २७ मार्च २०२२ रोजी सकाळी १०.३० वाजता श्रीराम वाचन मंदिर सावंतवाडीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेपूढील
विषय- १) मागील सभेचा आढावा घेणे
२) संयोजन समितीचा विस्तार करुन समितीला अंतिम रुप देणे
३) संमेलनाच्या अध्यक्षांचे नाव निश्चित करणे.
४) स्वागताध्यक्षाची निवड करणे
५) संमेलनाच्या जागा निश्चित करणे
६) संमेलन खर्चाचे अंदाजपत्रक निश्चित करुन नियोजन करणे
७)संमेलनाच्या विविध समित्या गठीत करणे.

तरी या बैठकीस जास्तीत जास्त सभासदानी उपस्थित राहून संमेलन यशस्वी करण्यात आपला सहयोग द्यावा तसेच आपल्या संपर्कातील कार्यकर्ते, साहित्यिक, कलावंत मित्र उपस्थित राहतील यादृष्टीने प्रयत्न करावेत. असे आवाहन अंकुश कदम :सेक्रेटरी
संयोजन समिती, बहुजन साहित्य-कला-संस्कृती संमेलन सावंतवाडी २०२२ यानी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!