*कोकण Express*
*कळसुली जि. प. शाळा दिंडवणे येथे जागतिक वन दिन व जल दिन साजरा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
कळसुली जि. प. केंद्र शाळा दिंडवणे नं. २ येथे जागतिक वन दिन व जल दिन मा. वनक्षेत्रपाल श्री. घुंनकिकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कोकम व बेल झाडांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. वनक्षेत्रपाल श्री. घुंनकिकर यांनी विद्यार्थ्यांना वन दिन व जल दिन निमित्ताने तरुण पिढीने वन कसे वाचवलं पाहिजे. पाण्याची पातळी कशी वाढवावी याबद्दल मार्गदर्शन केले.
यावेळी वनक्षेत्रपाल घुंनकिकर, वनपाल तानाजी दळवी, वनरक्षक गळवे, वनमजूर सुद्रिक, तातू गावकर, अनिल सावंत, शिक्षक सृष्टी गुरव, शिक्षक निशा सातवशे, पालक, विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते.