लाचेची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी कंठाळे यांना अटक

लाचेची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी कंठाळे यांना अटक

*कोकण  Express*

*लाचेची मागणी करणाऱ्या वायंगणी तलाठी कंठाळे यांना अटक*

*सोमवारी आचरा येथे अँटी करप्शन ब्युरो ची कारवाई*

*आचरा ः प्रतिनिधी*

तोंडवळी गावात खाडीकिनारी वाळू उपसा करून वाळूचा व्यवसाय करणाऱ्या तक्रारदार यांच्या कडे विठ्ठल वैजीनाथ कंठाळे तलाठी सजा तोंडवळी,वायंगणी यांनी लाचेची मागणी केल्यावरुन गुन्हा दाखल करून सोमवारी सायंकाळी त्यांना अँटी करप्शन ब्युरो कडून अटक करण्यात आली आहे.

तक्रारदार व त्यांचे मित्र यांच्या वाळू उपशा ठिकाणी रँपवर येऊन तसेच वाळूच्या गाड्या थांबवून दंड न करण्यासाठी पैशाची मागणी करून नाहक त्रास देत होते. वाळू उपसा टेंडर मंजूर झालेले असूनही अद्याप त्यांना पास मिळाला नसल्याने तक्रारदार यांनी वाळूचे काम बंद ठेवलेले होते. तरी सुद्धा तोंडवळी गावचे तलाठी कंटाळे यांनी तक्रारदार यांना फोन करून पन्नास हजार रुपये घेऊन यायचे सांगितल्याने तक्रारदार यांनी तलाठी कंटाळे यांची लाचलुचपत प्रतिबंधक सिंधुदुर्ग यांच्याकडे पाच मार्च रोजी लेखी तक्रार दिली होती.

तक्रारदार यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पाच मार्च रोजी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून तिच्या मागणीची पडताळणी केली असता तलाठी कंटाळे यांनी तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या मित्रांच्या वाळूच्या गाड्यांवर कारवाई न करता सहकार्य करण्यासाठी पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केलेली होती. म्हणून २१मार्च रोजी विठ्ठल वैजीनाथ कंठाळेयांच्या वर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम सन १९८८ चे कलम ७ अन्वये पोलीस ठाणे आचरा येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्हाकामी त्यांना अटक करण्यात आली आहे वरील कारवाई अँटी करप्शन ब्युरो चे पोलीस उपअधीक्षक दिपक कांबळे सिंधुदुर्ग यांच्याकडून कारवाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!