*कोकण Express*
*सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज मंडळ विद्यमान पदाधिकाऱ्यांचे कार्य कौतुकास्पद-ऍड.अनिल निरवडेकर*
*संत रविदास भवनाचे संकल्प चित्र केले प्रदान*
*कणकवली ः प्रतिनिधी*
संत रविदास भवन हे समस्त चर्मकार बांधवांचे एक स्वप्न आहे.यापूर्वीच्या सर्वच जिल्हा पदाधिकारी यांनी यासाठी निश्चितच प्रयत्न केले.आपल्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कालावधीत मंडळाचे नावे सन 2016 मध्ये जागा खरेदी झाली.त्यानंतर त्या जागी भवन व्हावे अशी सर्वांची मनोमन इच्छा असताना मधला कालावधी असाच लोटला.परंतु जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांचे नेतृत्वाखालील जिल्हा मंडळाने मेहनत घेऊन भवनाचे स्वप्न साकार करण्यास यशस्वी पुढाकार घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन असून त्यांच्या कार्यास शुभेच्छा देण्यासाठी आपण संत रविदास भवनाचे संकल्प चित्र त्यांना सुपूर्द करत आहे.असे प्रतिपादन जिल्ह्यातील प्रतिथयश वकील व जिल्हा मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक ऍड.अनिल निरवडेकर यांनी केले.
यावेळी त्यांनी संत रविदास भवनाचे संकल्पचित्र जिल्हाध्यक्ष सुजित जाधव व जिल्हा सरचिटणीस चंद्रसेन पाताडे यांना सुपूर्द केले.