रविवार असूनही आरोग्य शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी कार्यालयीन कामकाजात

रविवार असूनही आरोग्य शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी कार्यालयीन कामकाजात

*कोकण  Express*

*रविवार असूनही आरोग्य शिक्षण सभापती डॉ.सौ.अनिशा दळवी कार्यालयीन कामकाजात*

*सिंधुदुर्गनगरी*

जिल्हा  परिषदेतील लोकनियुक्त पदाधिकारी म्हणून  शिक्षण व आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी यांचा जिल्हा परिषद मधील  अशासकीय पदावरील या पंचवर्षांमधील कामकाजाचा
हा शेवटचा दिवस  रविवार असूनही  सभापती दळवी  यांनी त्यांचे दालनामध्ये  आज उपस्थिती दर्शवून कार्यालयीन कामकाज केले
यावेळी आपल्या आवडत्या सभापतींना निरोप देण्यासाठी आणि भावी उज्वल भवितव्य शुभेच्छा व शुभ आशीर्वाद देण्यासाठी शिक्षण विभागातील व आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी यांनी त्यांचे दालनात त्यांची भेट घेऊन त्यांना शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला

सिधुदूगनगरी येथील सभापती  दालनात  सभापती डॉ.  अनिशा दळवी यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन   केले  कर्मचाऱ्यांनी व अधिकारी यांनी कोणाचा कोणत्याही दडपणाखाली न येता आपले कर्तव्य प्रामाणिकपणे व सचोटीने  पार पाडावे कार्यालयीन कामकाज करीत असताना कर्मचाऱ्यांनी आपले ज्ञान हे अद्ययावत ठेवावे त्याकरिता नवीन नवीन येणारे शासकीय मार्गदर्शन व परिपत्रके यांचा अभ्यास करावा असे त्यांनी आपले भाषणामध्ये सांगितले.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज रविवार हा साप्ताहिक सुट्टीचा दिवस असूनही शिक्षण व आरोग्य विभागातील खातेप्रमुख व कर्मचारी आपल्या आवडत्या सन्माननीय सभापतींना निरोप व शुभेच्छा देण्याकरिता मोठ्या संख्येने उपस्थित होते ही  सन्माननीय सभापती यांच्या आजपर्यंतच्या कर्तव्याची  पोहोच पावतीच होती.सभापती  अनिशा दळवी  याच्या  उपस्थित अधिकारी कमचारी  यानी अचानक  पण सुटसुटीत  देखणा लोकपतिनीधी  कामकाजातील शेवटचा दिवस आनंद  द्विगुणीत  केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!