फोंडाघाट येथे पाचोबा कडे कारला अपघात ; दोघे जखमी

फोंडाघाट येथे पाचोबा कडे कारला अपघात ; दोघे जखमी

 *कोकण  Express*

*फोंडाघाट येथे पाचोबा कडे कारला अपघात ; दोघे जखमी*

*कणकवली  ः प्रतिनिधी*

कोल्हापूरहून कणकवली च्या दिशेने जाणारी कार झाडाला आदळून झालेल्या अपघातात कारमधील दोघे प्रवासी जखमी झाले आहेत. कार क्र. ( MH – 43 AR -2337 ) मधील प्रवासी कणकवली च्या दिशेने जात होते.पाचोबा देवस्थान नजीक कार आली असता चालकाचे नियंत्रण सुटून झाडावर आदळली. या अपघातात कारमधील दोघे प्रवासी किरकोळ जखमी झाले. जखमींना स्थानिक सुमित मेजारी, अप्पा सामंत यांनी 108 ऍम्ब्युलन्समधून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!