*कोकण Express*
*नवतरूण मंडळाची कासार्डे ते विजयदूर्ग मोटरसायकल रॅली*
*कासार्डे ः संजय भोसले*
हर हर महादेव….. जय भवानी जय शिवाजी… छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करून कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ कासार्डे व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून तळेरे कासार्डे मार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळयासह मोटारसायकल रॅली काढण्यात आली.
या रॅलीचा शुभारंभ माजी आमदार प्रमोद जठार यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.यावेळी अध्यक्ष सहदेव खाडये,रमेश मुणगेकर, रुपेश कानसे, राकेश मुणगेकर, किरण मुणगेकर,निळकंठ शेटये,आप्पा खाडये,गुरूप्रसाद सावंत,राजू शेटये,मंदार कदम,निखिल पिसे, निलेश पवार,प्रथमेश तिर्लोटकर, सूरज देवरूखकर,सचिन चव्हाण,निखिल केळवलकर, याच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व ग्रामस्थ,शिवप्रेमी तसेच नवतरूण उत्कर्ष मंडळाचे व राजा शिवछत्रपती ग्रुपचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.
यावेळी तळेरे मार्गे विजयदुर्ग मोटारसायकल रॅलीत मोठया संख्येने युवक सहभागी झाले होते.विजयदुर्ग किल्ल्यावर शिवाजी महाराज की जय अशा अनेक घोषणा देत परीसर दणाणून सोडला.यानंतर पुन्हा विजयदुर्ग ते कासार्डे अशी रॅली आणत रॅलीचा समारोप करण्यात आला.

