ॲड. अभिषेक अजित गोगटे यांची केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती

ॲड. अभिषेक अजित गोगटे यांची केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती

*कोकण  Express*

*ॲड. अभिषेक अजित गोगटे यांची केंद्र सरकारचे वकील म्हणून नियुक्ती*

केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सरकारच्या अखत्यारीतील संस्थांचे दावे जिल्हा न्यायालयात चालविण्यासाठी (करांविषयीचे दावा वगळून) वकिलांची नियुक्ती करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ॲड. अभिषेक अजित गोगटे यांची केंद्र सरकार मार्फत वकील म्हणून तीन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली आहे.
यापूर्वी सन २०१८ ते २०२१ या कालावधीकरिता जिल्हा सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. दिनांक ०३ मार्च २०२२ रोजीच्या केंद्र सरकारच्या कायदा व न्याय विभागाने त्यांची फेर निवड केली आहे.
ॲड. अभिषेक अजित गोगटे यांची केंद्र सरकार मार्फत  वकील म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!