*कोकण  Express* आंबोली सोसायटी निवडणूकीत भाजपचा एकतर्फी विजय : सेना पुरस्कृत पॅनलचा धुव्वा

*कोकण Express* आंबोली सोसायटी निवडणूकीत भाजपचा एकतर्फी विजय : सेना पुरस्कृत पॅनलचा धुव्वा

*कोकण Express*

*आंबोली सोसायटी निवडणूकीत भाजपचा एकतर्फी विजय : सेना पुरस्कृत पॅनलचा धुव्वा*

*सहकार वैभव पॕनलने जिंकल्या १३ पैकी १३ जागा*

*आंबोली । प्रतिनिधी* 

आंबोली सोसायटी निवडणूकीत विरोधी पॅनलचा धुव्वा उडवत भाजपने एकतर्फी विजय प्राप्त केला. भाजपा पुरस्कृत सहकार वैभव पॕनलने १३ पैकी १३ जागा जिंकत विजयाचा गुलाल उधळला.
या विजया नंतर जिल्हा बँक संचालक महेश सारंग यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. यावेळी
आंबोली सरपंच गजानन पालेकर, उपसरपंच दत्तू नार्वेकर, माजी आरोग्य व शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, केतन आजगांवकर, रामा गावडे, माजी सरपंच शशीकांत गावडे, गेळेचे माजी सरपंच मनोहर बंड, संतोष पालेकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
या निवडणुकीत सहकार वैभव पॅनलचे खुल्या गटातील उमेदवार शशिकांत गावडे, चंद्रकांत गावडे, महादेव गावडे, रामचंद्र गावडे, मनोहर बंड, विकास गावडे, उमेश पडते, विठ्ठल सरमळकर, महिला प्रतिनिधी नमिता राऊत, दिव्या सावंत, भटक्या विमुक्त जाती मतदार संघातून बाळू यमकर, अनुसूचित जाती मतदार संघातून शंकर चव्हाण, तर इतर मागास प्रवर्गातून प्रदीप नार्वेकर यांनी सेना पुरस्कृत उमेदवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
या निवडणुकी करीता निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजन आरविंदेकर यांनी काम पाहिले. तर केंद्राध्यक्ष म्हणून आर टी चौगुले, मतदान अधिकारी महेश धुमाळ, पी एस जाधव, गोविंद परब, राजन राणे व गजानन दळवी यांनी काम पाहिले. यावेळी पोलीस कॉन्स्टेबल दत्तात्रय देसाई, अभिजित कांबळे व पोलिस नाईक दीपक शिंदे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!