वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुळपार येथील प्रशिक्षणार्थीनी कळसुली येथील राजवर्धन ऍग्रो फ्रुड फॉर्म हाऊसला दिली भेट

वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुळपार येथील प्रशिक्षणार्थीनी कळसुली येथील राजवर्धन ऍग्रो फ्रुड फॉर्म हाऊसला दिली भेट

*कोकण  Express*

*वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुळपार येथील प्रशिक्षणार्थीनी कळसुली येथील राजवर्धन ऍग्रो फ्रुड फॉर्म हाऊसला दिली भेट*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुळ पार येथील प्रशिक्षणार्थी मधमाशी पालन प्रशिक्षण प्रात्यक्षिक कार्यक्रम कळसुली येथील राजवर्धन ऍग्रो फ्रुडच्या फॉर्म हाऊसला प्रशिक्षणार्थी भेट दिली. कळसुली तिसगवाडी येथे राजवर्धन ऍग्रो फ्रुडच्या व सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, व विराज गोसावी यांच्या संयुक्त विद्यमाने कळसुली येथे २५० मधपेट्या सुरंगी व जांभूळ झाडांच्या फुलोर्‍ याला सुरुवात झाली असल्याने मधपेट्या लावण्यात आल्या आहेत. डॉ. मनोज गडाळे म्हणाले, कळसुली गावाला निसर्गाने दिलेली जांभूळ,सुरंगी सोबतचं, जंगली औषधी वनस्पती मोठ्या प्रमाणावर असून शेतकऱ्यांना मधमाशीचा खूप मोठा फायदा होऊ शकतो. काही झाडांच्या फुलोऱ्यातून मोठ्या प्रमाणात मध मिळतो. कोकणातील जंगली व औषधी वनस्पती मात्र कोकणवासीयांनी जपायला हव्यात.

यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा खादी ग्रामउद्योगअधिकारी सिंधुदुर्ग मा.आनंद करणे, प्रा. खेडेकर मॅडम, डॉ. मनोज गडाळे, सामाजिक कार्यकर्ते सुशांत दळवी, पत्रकार विराज गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष चंदू परब, दिवाकर दळवी, रूजाय फर्नांडिस, संतोष सुतार, नयना परब, रूपाली दळवी,एलक्स पिंटो,तसेच कळसुली गावातील महिला बचत गटातील महिला, तसेच वसुंधरा विज्ञान केंद्र नेरुळपार येथील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!