*कोकण Express*
*आम. नितेश राणे यांची कणकवलीत एन्ट्री होताच सेना- राष्ट्रवादीला धक्का*
*राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत केला प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आमदार नितेश राणे यांच्या कणकवलीतील एन्ट्री नंतर पहिला धक्का शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्षाला बसला आहे.काळसुली येथील गजानन मटकर, राजेंद्र दळवी, रणजित दळवी, माधवी नाईक यांच्या सह कळसुलीतील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला.कणकवली येथील ओमगणेश निवासस्थांनी हा पक्ष प्रवेश झाला.आमदार नितेश राणे यांनी या सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री,कळसुली उपसरपंच सचिन पारदिये,कळसुली गाव प्रमुख जयवंत गावकर, शामसुंदर दळवी,कमलाकर दळवी, काका धरणकर, स्वप्नील गोसावी, रणजित मेस्त्री , संजय दळवी, राजू नारवेक अरुण दळवी, लाडू गावकर, पंकज सावंत, प्रवीण दळवी, श्री.वारंग,अशोक गावकर व गावकर वाडीतील अन्य ग्रामस्थ असे अनेक लोकं उपस्तित होते.
