*कोकण Express*
*उद्धव ठाकरे एक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले हा राज्यासाठी कलंक*
*माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते,खासदार नारायण राणे यांचा पत्रकार परिषदेत घणाघात*
*मातोश्रीच्या आत-बाहेरील कुडल्या काढल्यास तुमची झोप उडेल*
*कणकवली ः प्रतिनिधी*
उद्धव ठाकरे एक वर्ष महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले हा राज्यावर कलंक आहे.सर्वच स्थरावर महाराष्ट्राला अधोगती कडे नेले.महाराष्ट्रला ड्रायव्हर नको. कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवा आहे.
केंद्र सरकार विरुद्ध सूड उगवायला तुमची अवकात आहे काय ? मुख्यमंत्री म्हणून स्वतःचे अधिकार काय आहेत ते आधी ओळखा.प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी,गृहमंत्री अमितजी शहा यांच्या बद्दल बोलण्याची तुमची पात्रता आहे काय हे आधी ओळखा.भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सक्षम आहोत. कायत्या पोकळ धमक्या द्या.मात्र आम्ही मागे लागलो तर तुमच्या सर्वच कुडल्या बाहेर काढू मतोश्रीतच्या आतल्या आणि बाहेरच्याही कुडल्या जनतेसमोर मांडु मग झोपही लागणार नाही,अशी अवस्था करू असा इशारा माजी मुख्यमंत्री,भाजपा नेते,खासदार नारायण राणे यांनी दिला.
माजी मुख्यमंत्री,खासदार नारायण राणे यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषद घेतली यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली,प्रदेश सचिव प्रमोद जठार,महिला जिल्हाध्यक्ष सौ.संध्या तेरसे,राजू राऊळ रणजित देसाई,भाई परब आदी उपस्थित होते.
खासदार नारायण राणे म्हणाले,एक वर्ष पूर्ण झाल्याबद्दल सामानाचे मालक मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची मुलाखत वाचली.सव्वातासातच्या मुलाखती विकासासाठी काही नाही.राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे.महसुली तूट 35,% आहे.कर्ज 5 लक्ष दोन हजार कोटीचे आहे या संबधी काही न बोलता हेवेत भाषण देऊन पोकळ धमक्या देणारी मुलाखत आज वाचली.
त्यात हात धुवून मागे लागनार हे वाक्य पुरोगणी महाराष्ट्र च्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही.
56 आमदारांचे सरकार किती दिवस चालले.याचा विचारकरून केंद्र सरकारवर टीका करावी.ईडीला धमकी देता,अधिकाऱ्यांना धमकवता, की भाजपाच्या नेत्यांना धमकी देता.तुमच्या पोकळ धमक्यांना आम्ही भीक घालत नाही.
सामना त्यांचा मुलाखत त्यांची २४ तास सुद्धा घेऊ शकतात. मात्र असल्या धमक्या देण्याचे परिणाम कोणावर होणार, संजय राऊत प्रश्न विचारता आणि तेच उत्तर देतात.प्रधानमंत्री वर टीका करता.तुमची अवकात आहे काय असा संतप्त सवालही खासदार नारायण राणे यांनी केला.
सुशांत सिंहची केस, दिशा सलियांची केस आम्ही विसरलो नाही.आम्हला धमकी देतो.दिशा सालीयानवर बलात्कार करून खून केला.त्यांच्याशी मैत्री करायला आम्ही सांगितले नाही.ते प्रकरण आजून आम्ही विसरलो नाही तेव्हा अशा धमक्याने काही होणार नाही. जर खून झाला नसेल तर मुख्यमंत्री म्हणून खुलासा करा.
एकवर्षात विधायक काय केले.दिली काय कर्जमाफी, 46 हजारापेक्षा जास्त लोक कोरणातबळी गेले.उद्धव ठाकरे सरकार देशात कोरोनात नंबर एक आहे.मर्दाला मर्द आहे हे सांगावे लागत नाही.अशी टीका केली.
पुढच्या वर्षी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असल्याचे पाहणे सर्वात दुर्दैवी असेल.असे सांगताना देशात महाराष्ट्र एक नंबरचे राज्य होते तेआज राहिले नाही.डॉक्टर नाही, औषधे नाहीत उपचार नाही.एक वर्ष मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले हा कलंक आहे.हिंदूत्व वर बोलण्याचा नैतिक अधिकार त्याना नाही.मुख्यमंत्री पदासाठी
प्रशासकीय अज्ञान आहे याची कबुली 17व्या मिनिटाय मुलाखतीत दिली असा मुख्यमंत्री कधी पहिला नव्हता.
महाराष्ट्रला ड्रायव्हर मुख्यमंत्री नको. कर्तृत्ववान मुख्यमंत्री हवा.ड्रायव्हर व्हायचे असेल तर नोकरी करा. एक वर्षात अधोगती कडे महाराष्ट्र नेला असे हे ड्रायव्हर आहेत अशी टीका त्यांनी केली.
आम्ही कोणत्या कारवाईला घाबरत नाही केंद्राचे नावच घेऊ नका.तुमची लायकी नाही.
बळासाहेबांचे नाव घेण्याची पात्रता नाही.ते असते तर आज उद्धव ठाकरेना मुख्यमंत्री केले नसते.हिंदुत्व विचार सोडले नसते, भाजपा सोबतची युती तोडली नसती.
सामनातून डरकाळी नाही फुसके बार फोडतात.दिवाळीत वाजले नाही म्हणून आता फोडतता.
जनहितासाठी हे सरकार नाही स्वतःसाठी सरकार आहे.त्याचे पाप राष्ट्रवादी आणि कॉग्रेस वरही आहे अशी टीका खासदार नारायण राणे यांनी केली.