*कोकण Express*
*भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे निम्म्या किंमतीतील घरघंटी व वॉटर फिल्टर चे वाटप*
*मळेवाड ःःप्रतिनिधी*
भाजप प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मळेवाड येथे निम्म्या किंमतीतील घरघंटी व वॉटर फिल्टर चे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
भाजप चे माजी खासदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून निम्म्या किंमतीतील मागेल त्याला घरघंटी व वॉटर फिल्टर योजना सुरू करण्यात आली होती. मळेवाड – कोंडूरे ग्रामपंचायतच्या वतीने या घरघंटी व वॉटर फिल्टर चे वाटप करण्यात आले. एकूण 41 लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेतला. माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मळेवाड सुदर्शन सभागृह येथे या वस्तूंचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाची प्रस्तावना उपसरपंच हेमंत मराठे यांनी केली.यावेळी सरपंच मिलन पार्सेकर यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले.त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत माजी आमदार निलेश राणेंना वाढ दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. लाडोबा केरकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना निलेश राणे यांनी लोकांना रोजगार मिळावा हा दृष्टीकोन डोळ्यासमोर ठेवून ही योजना सुरु केली आहे. याचा आपण लाभ घेतला असून भविष्यातही राणे साहेबांच्या माध्यमातून नवनवीन योजना आपल्यापर्यंत आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे मत व्यक्त केले. यावेळी सदानंद चव्हाण यांनी मनोगत व्यक्त करताना ग्रामपंचायत च्या माध्यमातून उपसरपंच हेमंत मराठे यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सर्व सहकारी चांगले काम करत असून ही ग्रामपंचायत अशा प्रकारचे उपक्रम गावात राबवित असल्याबद्दल त्यांचे कौतुक केले. तर युवा कार्यकर्ते भिवसेन मुळीक आपले मनोगत व्यक्त करताना नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच व सदस्य गावाच्या विकासासाठी योग्य पद्धतीने काम करत असून मागील काही वर्षाचा विचार करता या वर्षभरात अतिशय सुसज्ज असे काम ही सर्व मंडळी करत आहेत. गावाचा विकास करीता ते करत असलेले प्रयत्न याला आपण सर्वांनी साथ देणे गरजेचे असल्याचे सांगत पुढील जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत आपण सर्वांनी एकजुटीने उपसरपंच हेमंत मराठे यांच्या पाठीशी उभे राहणे गरजेचे आहे.तसेच आता येऊ घातलेल्या मळेवाड विकास सोसायटी निवडणुकीतही आपण सर्वांनी एकत्र येऊन पॅनेल उभे करून निवडणूक लढवण्याचा विचार त्यांनी उपस्थितांसमोर मांडला.ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गुरु मुळीक यांनी आपले मत व्यक्त करत असताना ग्रामपंचायत चे काम अतिशय सुंदर पद्धतीने सुरू असून ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक उपक्रम राबवले गेले आहेत.ग्रामपंचायत निवडणुकीत आम्हीं सर्वजण एकत्र येत नवोदीत उमेदवारांना भरगोस मतांनी निवडून आणले. त्यांच्याकडून अतिशय सुंदर पद्धतीने कामकाज सुरू असल्याचे बघून आम्ही योग्य उमेदवारांना मदत केल्याचे समाधान वाटत असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सरपंच मिलन पार्सेकर,लाडोबा केरकर,ग्रामपंचायत सदस्य महेश शिरसाट,भिवसेन मुळीक,सदानंद चव्हाण,जनार्दन नाईक,बाबल नाईक,दादा मोरुडकर,अमित नाईक,विजय चराटकर ,नारायण कांबळी,प्रशांत आपटे, मिलन कृष्णा पार्सेकर,परशुराम मुळीक, पत्रकार मदन मुरकर उपस्थित होते.आभार प्रदर्शन उपसरपंच हेमंत मराठे यांनी केले.