*कोकण Express*
*स्व. सुनिल तळेकर ट्रस्टचा अनोखा उपक्रम”७५ वर्षे पुर्ण केलेल्या कर्तुत्ववान महीलांच्या कार्याचा गौरव.”*
*कासार्डे ः संजय भोसले*
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे त्या दिना निमित्त तळेरे परिसरातील 75 वर्षे पुर्ण झालेल्या महिलांचा सत्कार करणे हा नाविन्यपूर्ण व कौतुकास्पद उपक्रम आहे. ट्रस्ट आणि वाचनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष महिला गौरव कार्यक्रमात वाचनालयाचे संस्थापक अध्यक्ष रमाकांत वरुणकर यांनी प्रतिपादन केले.
महिला दिनाचे औचित्य साधून तळेरे येथील स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्ट आणि स्व. सुनिल तळेकर सार्वाजनिक वाचनालय यांच्यावतीने कर्तुत्ववान महिला आणि 75 वर्षे पूर्ण केलेल्या महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, जगन्नाथ तळेकर, ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश तळेकर, वाचनालयाचे अध्यक्ष विनय पावसकर, उदय पाटिल, बापू महाडिक, उद्योजीका श्रीम. गवस, नितीन तळेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या अमृत महोत्सवी वर्ष आणि स्व. सुनिल तळेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी वर्षा निमीत्त महिलांचा विशेष गौरव करण्यात आला. तळेरे गावातील 75 वर्षे पूर्ण केलेल्या 50 महिलांना शाल, श्रीफळ व पुष्प तसेच, आपल्या कर्तुत्वाने कुटूंब सांभाळणार्या उद्योजक 20 महिलांना प्रमाणपत्र व पुष्प देऊन गौरविण्यात आले. तसेच, मराठी भाषा दिनानिमित्त आयोजित केलेल्या शालेय वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या मुलांना प्रमाणपत्र, शालेय साहित्य देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा केसरकर, श्रावणी मदभावे,यानी केले, प्रास्ताविक विनय पावसकर यांनी तर आभार शशांक तळेकर यांनी मानले. यावेळी भाई खानविलकर, राजू वळंजू, मिनेश तळेकर, हेमंत महाडीक यांच्यासह ट्रस्ट आणि वाचनालयाचे सदस्य उपस्थित होते.