*कोकण Express*
*वेंगुर्ले-खानोली-सुरंगपाणी विठ्ठल पंचायतनाचा वर्धापन दिनी विविध 40 फळांचा नैवेद्याचे खास आकर्षण 33 कोटी देवता व 7 सप्तर्शीसाठी हा नैवेद्य*
*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*
खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थान मधील श्री विठ्ठल रखुमाई मंदिराचा 28 वर्धापन दिन फाल्गुन शुध्द आमलकी एकादशी व व्दादशी या दोन दिवसांत विविध धार्मिक अध्यात्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाने साजरा झाला. या वर्धापन दिनांत आगळ्यावेगळ्या पध्दतीने म्हणजे 33 कोटी देवता व 7 सप्तर्शी यांना विविध प्रकारच्या 40 फळाच्या नैवेद्य हे खास या वर्धापन दिनाचे वैशिष्ट्य ठरले.
आमलकी एकादशी या दिवशी आवळीवृक्षाचे पूजन करून विठ्ठल रखुमाईच्या मुर्त्यांचे पुजन होताना 33 कोटी देवतांना व सप्तर्शी 7 ऋषिंसाठी विविध 40 फळांचा नैवेद्य दाखविण्यांत आला. दोन दिवसांच्या कार्यक्रमांत नामवंत बुवा अवधुत नाईक यांचे विठ्ठलावर आधारीत किर्तन तसेच चक्रीकीर्तन पार पडले. एकादशीचा उपवास असल्याने दुसऱ्या दिवशी विविध 40 फळांचा नैवैद्य या कार्यक्रमांस आलेल्या असंख्य भाविकांना महाप्रसादांपूर्वी देण्यांत आला. सलग देान दिवस चाललेल्या या कार्यक्रमाचे खास वैशिष्टय़ लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तसेच गोवा राज्यातील भाविकांती या खानोली सुरंगपाणी येथील श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानच्या या कार्याक्रमांस खास उपस्थिती दर्शविली. श्री विठ्ठल पंचायतन देवस्थानचे व्यवस्थापक दादा पंडित महाराज यांनी या कार्यक्रमांस आलेल्या सर्व भाविकांना या धर्मस्थानाची निर्मीती बाबत मार्गदर्शन केले.