*कोकण Express*
*जांभवडे पंचक्रोशीच्या विकासाचा शिल्पकार काळाच्या पडद्याआड*
*प्राचार्य महेंद्र नाटेकर यांचे दु:खद निधन*
न्यू शिवाजी हायस्कूल, जांभवडे ता. कुडाळ या प्रशालेचे माजी प्राचार्य श्री. महेंद्र नाटेकर सर यांचे आज गोवा येथे उपचारादरम्यान दु:खद निधन झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक, सामाजिक व राजकीय चळवळीत अग्रभागी असलेले आणि जांभवडे पंचक्रोशीच्या विकासाचे शिल्पकार असलेले नाटेकर सर काळाच्या पडद्याआड गेले. अनेक शैक्षणिक, सामाजिक, राजकीय चढ- उतारावर संघर्ष करत असताना मृत्यूशी शेवटपर्यंत केलेला संघर्ष अयशस्वी झाला आणि अखेर गोवा येथे उपचारादरम्यान अष्टपैलू व्यक्तिमत्त्व, आदर्श मुख्याध्यापक, उत्कृष्ट वक्ता, समाजसेवक, उत्तम लेखक, धडाडाडीचे नेतृत्व, शिस्तप्रिय आणि विद्यार्थी प्रिय प्राचार्य, माजी जिल्हापरिषद सदस्य स्वतंत्र कोकण राज्यासाठी शेवट पर्यंत आशावादी असलेले नेतृत्व , घोटगे सोनवडे घाटा साठी आत्मदहनाचा इशारा देऊन प्रयत्न करणारे नाटेकर सर यांचे दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने जांभवडे पंचक्रोशी बरोबर संपुर्ण जिल्ह्यातील शैक्षणिक सामाजिक क्षेत्रातील लोकांनी हळहळ व्यक्त केली. आपल्या जीवनातील आपले आदर्श, मार्गदर्शक ,प्रेरणास्थाना यांना आपण मुकल्याची भावना सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सरांचे आवडते शिष्य -श्री.वामन तर्फे यांनी व्यक्त केली.सरांना* भावपूर्ण श्रद्धांजली