*कोकण Express*
*आमदार नितेश राणे, गोट्या सावंत यांचा कणकवली तालुक्यात येण्यास मार्ग मोकळा*
*राकेश परब यांनाही मिळणार प्रवेश*
*कणकवली ः प्रतिनिधी*
शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणातील दोषारोपपत्र आज कणकवली पोलिसांनी कणकवली न्यायालयात दाखल केले. तपासी अधिकारी कणकवली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन हुंदळीकर यांनी हे दोषारोपपत्र दाखल केले असल्याची माहिती दिली.
घटनेच्या ९० व्या दिवशी हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले आहे. त्यामुळे भाजपा आमदार नितेश राणे यांच्या सह संदेश उर्फ गोट्या सावंत,आणि राणेंचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचा कणकवली तालुक्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. शिवसैनिक हल्ला प्रकरणी जिल्हा न्यायालयाने आमदार नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत आणि राकेश परब यांना जामीन देतांना जोपर्यंत या प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात पोलीस दाखल करत नाहीत तोपर्यंत आरोप असलेल्या या तिघांनीही कणकवली तालुक्यात प्रवेश करू नये असे आदेश दिले होते. आज हे दोषारोपपत्र दाखल झाले असल्यामुळे कणकवली तालुक्यातील प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे.