*कोकण Express*
*सामाजिक उपक्रम राबवत माजी खासदार निलेश राणे यांचा वाढदिवस उद्या होणार साजरा*
सावंतवाडी ः प्रतिनिधी
भाजप प्रदेश सचिव तथा माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी शहर भाजप कडून सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून, उद्या अनाथ आश्रमाला धान्य वाटप करण्यात येणार आहे. तसेच सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप करण्यात येणार आहे. तसेच यावेळी रक्तदात्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अशी माहिती माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली असून, यावेळी माजी खासदार निलेश राणे यांच्या संपर्क कार्यालयात सकाळी ११ वाजता केक कापून वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. यावेळी सर्व भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन संजू परब यांनी केले आहे.