*कोकण Express*
*युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा २७ मार्च रोजी*
*जिल्ह्यातील एकूण १७ केंद्रावर होणार परीक्षा*
*कणकवली ः प्रतिनिधी*
युवा संदेश प्रतिष्ठान आयोजित सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षा रविवार दि. २७ मार्च, २०२२ रोजी सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. इयत्ता ३री, ४थी, ६वी व ७वी साठी ही परीक्षा मराठी व सेमी इंग्रजी माध्यमातून होणार आहे. या परीक्षेचे औपचारिक उद्घाटन २७ मार्च रोजी रविवारी सकाळी १०.०० वा. विद्यामंदिर हायस्कूल कणकवली येथे होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण १७ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा घेतली जाईल. या परीक्षेसाठी जिल्हा भरातून ५२०० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
सिंधुरत्न टॅलेंट सर्च STS परीक्षेचे हे 5 वे वर्ष असून या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांना 2 लाख रुपयांची पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच ६वी व ७वी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक टॅब देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात येणार आहे. मुख्य परीक्षा केंद्र विद्यामंदिर हायस्कूल, कणकवली हे असून इतर परीक्षा केंद्र पुढीलप्रमाणे आहेत : फोंडा हायस्कूल, फोंडाघाट; जि. प. शाळा तरळे नं. १; शाळा जामसंडे नं. १, देवगड; शिरगाव हायस्कूल, शिरगाव; अर्जुन रावराणे विद्यालय, वैभववाडी; कुडाळ हायस्कूल, कुडाळ; कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी; खेमराज मेमो. हायस्कूल, बांदा; शाळा आंबोली नं. १; शाळा माडखोल नं. १; शाळा मळेवाड नं. १; टोपीवाला हायस्कूल, मालवण; रामगड हायस्कूल; शाळा आचरा नं. १; पाटकर हायस्कूल, वेंगुर्ला; केंद्र शाळा साटेली-भेटशी.
अधिक माहितीसाठी संपर्क सुशांत मर्गज (९४२०२०६३२६) परीक्षा प्रमुख सिंधुरत्न टॅलेंट सर्च यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन संजना संदेश सावंत, अध्यक्षा युवा संदेश प्रतिष्ठान तथा जि. प. अध्यक्ष सिंधुदुर्ग व संदेश उर्फ गोट्या सावंत संस्थापक अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान यांनी केले आहे.