*कोकण Express*
*नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आतापासून कामाला लागा ; रुपेश राऊळ*
*खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस केक कापुन साजरा*
जिल्ह्यात पार पडलेल्या अनेक निवडणुकांमध्ये आपल्याला चांगले यश मिळत असून, आगामी काळात देखील होणाऱ्या नगरपरिषद,जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी आतापासूनच आपल्याला कामाला लागले पाहिजे. असे आवाहन तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकप्रिय खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आज सावंतवाडी तालुका शिवसेनेच्या वतीने साजरा करण्यात आला असून, शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पडते यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस उत्साहात पार पडला आहे.
यावेळी खासदार विनायक राऊत यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला आहे.