*कोकण Express*
*वैभववाडी नगरपंचायत निवडणूक महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार…*
*शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत*
येथील नगरपंचायत निवडणूक आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढणार आहोत. लोकांची मागणी लक्षात घेता स्थानिक उमेदवार देण्यात येणार आहे.या ठिकाणी विरोधकांना कोण थारा देणार नाही, असा दावा शिवसेनेचे नेते तथा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतिश सावंत यांनी आज येथे केला. दरम्यान विरोधी गटाचे नगरसेवक हे केवळ ठेकेदारीत गुंतले आहेत. तालुक्याच्या विकासाकडे कोणाचे लक्ष नाही, आमदार नितेश राणे यांनी दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला आहे. त्यामुळे येणार्या निवडणूकीत येथील जनता त्यांना स्विकारणार नाही, असा दावा सावंत यांनी केला आहे.
बावीसशे लोकसंख्या असलेल्या छोट्याश्या शहरात कचरा प्रकल्प उभारण्यात ३७ लाख खर्च होत आहेत. मात्र त्या ठेकेदाराचा नेमका मित्र कोण आहे, हे आम्ही लवकरच जाहीर करणार आहे,असे सावंत म्हणाले.