*कोकण Express*
*खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस वैभववाडीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा*
*खा.राऊत यांना दिर्घायुष्य लाभण्यासाठी गांगो मंदिरात दुग्धाभिषेक*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
खासदार विनायक राऊत यांचा वाढदिवस आज वैभववाडीत विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा होत आहे. वैभववाडी तालुका शिवसेना व नगरसेवक तथा शहर प्रमुख प्रदीप रावराणे यांच्या माध्यमातून खा. राऊत यांना दिर्घायुष्य लाभावे म्हणून वैभववाडीत गांगो मंदिरात दुग्धाभिषेक करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नंदु शिंदे, तालुका प्रमुख मंगेश लोके, नगरसेवक प्रदिप रावराणे, अशोक रावराणे, माजी नगराध्यक्ष रविंद्र रावराणे, नगरसेवक रणजित तावडे, मनोज सावंत, सुनिल रावराणे, यशवंत गवाणकर, शंकर कोकरे, स्वप्निल रावराणे आदी शिवसैनिक उपस्थित होते.