*कोकण Express*
*16 मार्च रोजी देवगड इंद्रप्रस्थ हॉल येथे होणार शिवसेना कार्यकारणीची सभा*
सिंधुदुर्ग-रत्नागिरी जिल्ह्याचे खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, सिंधुदुर्ग-कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सूचनेनुसार देवगड तालुका कार्यकारिणीची सभा 16 मार्च रोजी सकाळी 10: 30 वाजता इंद्रप्रस्थ हॉल सात पायरी येथे जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर, गटनेते नागेंद्र परब, माजी जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत, नियोजन समिती सदस्य संदेश पारकर, अतुल रावराणे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, महिला संघटक अपूर्वा सावंत, महिला आघाडी तालुकाप्रमुख वर्षा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला उपतालुका प्रमुख, विभाग प्रमुख, नगराध्यक्ष, नगरसेवक, शहरप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, बूथ प्रमुख, महिला आघाडी, युवासेना अध्यक्ष, सरपंच, उपसरपंच, जि. प. सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, कृषी तालुका अध्यक्ष तसेच आजी-माजी पदाधिकारी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तालुकाप्रमुख विलास साळसकर, मिलिंद साटम, विभागप्रमुख पी. टी. पेडणेकर, शहर गटनेते संतोष तारी यांनी केले आहे.


