कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू

कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू

*कोकण Express*

*कबुलागतदार गावकर जमीन प्रकरणी ग्रामस्थांचे प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

आंबोली व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन संदर्भातील वन आणि महसूल चा अहवाल १४ मार्च पर्यंत तयार न झाल्याने ग्रामस्थांनी आज सावंतवाडी येथील प्रांत कार्यालय समोर धरणे आंदोलन पुकारले असून, या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ सहभागी झाले आहेत.

यावेळी कबुलायतदार गावकर जमीन भोगवटदार वर्ग १ म्हणून वाटपाबाबत तात्काळ निर्णय घ्यावा, कोणतीही चौकशी न करता करण्यात आलेल्या खाजगी वने, राखीव वने या नोंदी तत्काळ कमी करण्यात याव्यात, आमच्या हक्काची जमीन मिळवून देण्यासाठी शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी अशा मागण्या केल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!