*कोकण Express*
*कणकवली येथील रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न*
*कणकवली शहर रस्त्यावरील बांधवांपासून मुक्त करण्याचा प्रयत्न*
*कणकवली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर …
*कणकवली ः प्रतिनिधी*
कणकवली वरिष्ठ पोलीस निरिक्षक मान. सचीन सरांनी आज कणकवली करांची सभा आयोजीत केली होती. विषय कणकवलीमधील रस्त्यावरील निराधार बांधवांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्न करणे. कणकवली शहर रस्त्यावरील बांधवांपासुन मुक्त करणे.त्यासाठी जनजागृती म्हणुन ५ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता रॅली साठी जमावयाचे आहे. रॅली बाजारपेठेतुन नगरवाचनालयापर्यंत जाईल. तिथे जीवन आनंद संस्थेची माहितीचे प्रेझेंटेशन होईल. ह्या रँलीचा प्रचार प्रत्येकाने १० स्वयंसैवकां जमा करणै. अपेक्षीत स्वयंसेवक १५० -१७० रँली ऊप. राहतील. होळी निमित्त स्ट्रीट प्ले काहि गावांमध्ये सादर होतील. ज्यामध्ये संवीता आश्रमच्या कामाची माहिती दीली जाईल. संवीता आश्रमच्या आर्थिक मदतीसाठी निधी संकलन केले जाईल. त्याचे मार्ग १) रु. ३६५/- च्या पावत्यांची पुस्तकांचे वितरण होईल. २)वाढदिवसानिमित्त , श्राद्धानिमित्त बांधवांना जेवण देवु शकता. ३) दुकानांमध्ये मदतनिधी डबे ठेवणे. सर्वांत महत्वाचे रस्त्यावर कुणी निराधार बांधवांच्या पुनर्वसाठी पोलीसांना काॅल करतील.

यावेळी अशोक लक्ष्मण करंबळेकर, विजय शेट्टी, राजेश राज्याध्यक्ष, संजय मालंडकर, पंकज दळवी, संदीप राणे, राजेंद्र पेडणेकर, कामत, लेखा मेस्त्री, सरिता पवार, भिकाजी पवार, सुप्रिया पाटील, दादा कुडतरकर, संदीप परब, सचिन हुंदळेकर, कैलास इंपाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

