*कोकण Express*
*साळिस्ते येथे वुमेंस वेल बिइंग शिबिर संपन्न*
*कासार्डे ः संजय भोसले*
साळिस्ते येथील जागृती महिला ग्रामसंघ व एस. एस. पी. एम. लाइफ टाइम हॉस्पिटल, पडवे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वुमेन्स वेल बिइंग शिबिर हा महिलांसाठीचा उपक्रम राबविण्यात आला. त्यामध्ये रुग्ण तपासणीही करण्यात आली.
या उपक्रमात ग्रामसंघाचे पदाधिकारी सी.आर.पी. विशाखा कांबळे अध्यक्ष करुणा गुरव, सचिव रिया चिके, कोषाध्यक्ष तेजस्विनी साळीस्तेकर , लिपिका आकांक्षा कांबळे, साळीस्ते गावचे सरपंच मैथिली कांबळे, माजी सरपंच चंद्रकांत हरयान आणि सौ. शीतल हरयान व आशा सेविका सौ. दिया ताम्हणकर उपस्थीत होते.
डॉक्टर व इतर स्टाफ यांची टीम दाखल झाल्यावर लगेचच रुग्ण तपासणी सुरू झाली. त्या त्या आजाराच्या डॉक्टर पर्यंत जाण्यासाठी ग्रामसंघाचे पदाधिकारी व आशा सेविका यांनी सहकार्य व मार्गदर्शन केल्यामुळे कोणतीही समस्या न येता उपक्रम झाला. दरम्यान तपासून झालेल्या रुग्णांना सोबत घेऊन उपस्थित डॉक्टर व स्टाफ यांचे ग्रामसंघाच्या वतीने स्वागत करण्यात आले.
गावातील महिला तपासणी झाल्यावर पुरुषांनी देखील या उपक्रमात आपली तपासणी करून घेतली व मोफत शिबिराचा लाभ घेतला. दुपारी १.३० वाजेपर्यंत संपन्न झाला. ज्यांनी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे व डॉक्टर टीम चे ग्रामसंघाने आभार मानून त्यांना रवाना केले. महिलांनी महिला दिनानिमित्त महिलांसाठी राबविलेल्या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

