नाथ पै नगर महिलांतर्फे संविताश्रमाला साहित्य भेट

नाथ पै नगर महिलांतर्फे संविताश्रमाला साहित्य भेट

*कोकण Express*

*नाथ पै नगर महिलांतर्फे संविताश्रमाला साहित्य भेट*

*कणकवली ः प्रतिनिधी*

महिला दिनादिवशी विविध उपक्रम राबविले जातात. कणकवली शहरातील नाथ पै नगर येथील महिलांनी जीवन आनंद संचलित पणदूर येथील संविताश्रमातील वृद्धांची सुश्रूषा करत, त्यांना गृह उपयोगी वस्तू, धान्य देऊन महिलादिन साजरा केला. या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतूक होत आहे.

कणकवली नाथ पै नगर येथील महिला सातत्याने विविध उपक्रम राबवितात. महिलादिन उपक्रमाबाबत चर्चा करीत असतानाच अनाथाश्रमातील व्यक्तींचे जगणे जवळून पहाता यावे, व्यथा जाणून घेऊन त्यांच्या जगण्याचे मर्म आपणाला कळावे, असा उद्देश ठेवून या महिलांनी स्वकमाईतील जमा झालेल्या रकमेतून तांदूळ, गहू, तेल आदी जेवणाचे साहित्य खरेदी करत संविताश्रम गाठले. महिलांनी संविताश्रमातील वृद्ध आजारी व्यक्तींशी संवादही साधला. सदरच्या उपक्रमात नगरसेविका मानसी मुंज, सेवानिवृत्त शिक्षिका शुभलता पालयेकर, रश्मी जोगळे, सोनाली सावंत, अश्विनी राणे, अॅड. संयोगिता राणे, स्नेहा राणे आदीसह बच्चेकंपनी देखील सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!