कलंबिस्त येथील सह्याद्री कला-क्रीडा मंडळाला केसरकरांच्या माध्यमातून क्रीडा साहित्य उपलब्ध

कलंबिस्त येथील सह्याद्री कला-क्रीडा मंडळाला केसरकरांच्या माध्यमातून क्रीडा साहित्य उपलब्ध

*कोकण Express*

*कलंबिस्त येथील सह्याद्री कला-क्रीडा मंडळाला केसरकरांच्या माध्यमातून क्रीडा साहित्य उपलब्ध…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

कलंबिस्त-कदमवाडी येथील सह्याद्री कला-क्रीडा मंडळाला माजी राज्यमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी एक लाखाचे क्रीडा साहित्य उपलब्ध करून दिले आहे. या साहित्याचे लोकार्पण ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया कलंबिस्तकर यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याप्रसंगी संबंधित साहीत्य उपलब्ध करून दिल्याबद्दल मंडळाच्या वतीने श्री.केसरकर यांचे आभार मानण्यात आले.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष शाम कलंबिस्तकर, सचिव संजय पालकर, सदस्य दिपक कदम, राजेश कदम, अनिल कदम, सचिन कदम, बाळकृष्ण कदम, नंदू कदम, अमित कदम, गोविंद कदम, सुहास कदम आदींसह मोठ्या संख्येने युवा वर्ग व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!