देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची वैभववाडी भाजपाने केली होळी

देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची वैभववाडी भाजपाने केली होळी

*कोकण  Express*

*देवेंद्र फडणवीसांना बजावलेल्या नोटीसीची वैभववाडी भाजपाने केली होळी*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी महाविकास आघाडी सरकारने फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा येथील भाजपच्या वतीने महाविकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. तर फडणवीस यांना पाठविलेल्या नोटिशीच्या प्रतीची तालुका कार्यालयाच्या समोर होळी करण्यात आली.

यावेळी तालुकाध्यक्ष नासीर काझी, नगराध्यक्षा नेहा माईनकर, सोशल मीडिया प्रमुख बाबा कोकाटे, बंड्या मांजरेकर, महिला प्रतिनिधी प्राची तावडे, न. पं. समिती सभापती विवेक रावराणे, नगरसेविका यामिनी वळवी, रेवा बावधाने, अंकित सावंत, विनायक रावराणे, सिद्धेश कोकाटे, आर्यन खानविलकर, प्रशांत ढवण व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!