*कोकण Express*
*वैभववाडीत रावराणे समाज बांधवांकडून थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या ध्वजाचे अनावरण..*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
येथील संभाजी चौकात थोर युगपुरुष महाराणा प्रतापसिंह यांच्या ध्वजाचे अनावरण रावराणे समाज बांधवांनी केले. महाराणा प्रतापसिंह हे रावराणे समाजाचे मूळ वंशज असून समाज बांधव त्यांना आपले दैवत मानतात. त्यांच्या नावाने वैभववाडीत शिक्षण संस्था कार्यरत आहे. तसेच शहरात सुसज्ज भव्य कलादालन साकारण्यात आले आहे. त्यांच्या नावाने वैभववाडी येथे विविध उपक्रम राबविले जात आहेत. महाराणा प्रताप यांचा युद्धातील ध्वज वैभववाडीतील संभाजी चौकात गेले तीन-चार वर्ष फडकत आहे. आता त्या ठिकाणी नवीन ध्वजाचे अनावरण समाज बांधवांनी केले आहे. यावेळी समाजाचे ज्येष्ठ लक्ष्मण रावराणे यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी सज्जनकाका रावराणे, विजय रावराणे, जयेंद्र रावराणे, अरविंद रावराणे, संतोष रावराणे, सागर रावराणे, सुबोध रावराणे, सुनील रावराणे, संभाजी रावराणे, संजय रावराणे, महेश रावराणे, भारती रावराणे, मुकुंद रावराणे यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.