विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीची चिपळूणमध्ये होळी

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीची चिपळूणमध्ये होळी

*कोकण  Express*

*विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बजावलेल्या नोटीसीची चिपळूणमध्ये होळी*

*प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महाविकास आघाडीचा केला निषेध…*

*चिपळूण | प्रतिनिधी*

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना राज्य शासनाने आकसाने बजावलेल्या नोटीसीचा चिपळूण येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली निषेध नोंदवून त्याची होळी करण्यात आली आणि संपूर्ण भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी असल्याची ग्वाही भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील बदल्यांमधील भ्रष्टाचार उघड केल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्याच्या ऐवजी महाविकास आघाडी सरकारच्या पोलिसांनी देवेंद्र फडणवीस यांनाच नोटीस बजावली. याचा भाजपच्या वतीने निषेध करण्यात आला. तर
रविवारी प्रत्येक जिल्ह्यात नोटिशीची होळी केली जाणार असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घोषित केले होते. त्यानुसार चिपळूण येथे भाजपा प्रदेश सरचिटणीस माजी खासदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली नोटिसीची होळी करून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस रामदास राणे, नागेश धाडवे, माजी नगरसेवक परिमल भोसले, विजय चितळे, तालुकाध्यक्ष वसंत ताम्हणकर, शहराध्यक्ष आशिष खातू, माजी तालुकाध्यक्ष विनोद भोबस्कर, माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे, माजी उपनगराध्यक्ष निशिकांत भोजने, निलम गोंधळी, वैशाली निमकर, माजी तालुकाध्यक्ष सतीश मोरे, भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा रत्नागिरी जिल्हाध्यक्ष बाळा चिपळूणकर, किशोर पालशेतकर, भाजप युवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संतोष मालप, कामगार आघाडी संयोजक विनोद कदम, संतोष भडवळकर, संदीप सुखदरे, श्रीराम शिंदे, अजय साळवी, रोहन साळवी, गणेश नलावडे, जतीन घटे, शुभम पिसे, प्रथमेश भोबस्कर, संदेश भालेकर आदी उपस्थित होते.

आपले नेते देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी आम्ही सर्वचजण ठाम उभे आहोत अशी ग्वाही यावेळी कार्यकर्त्यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!