*कोकण Express*
*रिंगेवाडी येथे गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा भक्तगण प्रदक्षिणा सोहळा संपन्न*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
सालाबादप्रमाणे रिंगेवाडी येथे गगनगिरी महाराज आश्रम गगनबावडा भक्तगण प्रदक्षिणा सोहळा ढोल ताशांच्या गजरात ‘दिगंबरा दिगंबरा … श्रीपाद वल्लभ दिगंबरा… स्वामी गगनगिरी नाथाय नमः च्या जयघोषात फटाक्यांच्या आतष बाजीत संपन्न झाला. यावेळी ५०० जण भक्तगण या उत्सवात सहभागी झाले होते. दुपारी आरती व महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले. तसेच या उत्सवात गगनगिरी आश्रमासह रिंगेवाडी येथील महिलांनी मोठा सहभागी दर्शविला होता.
रिंगेवाडी सेवा मंडळ ग्रामीण व मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हा उत्सव दरवर्षी मोठ्या उत्सवात साजरा केला जातो. यावेळी उपसरपंचासह रिंगेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.