*कोकण Express*
*वेंगुर्ला पणजी गाडी तात्काळ सुरू करावी*
*मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांची वेगुर्ला स्थानक प्रमुखांकडे मागणीी*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
मळेवाड उपसरपंच हेमंत मराठे यांनी वेंगुर्ला पणजी गाडी तात्काळ सुरू करावी अशी मागणी वेगुर्ला स्थानक प्रमुखांकडे केली आहे.
कोरोना काळात अनेक तरुण तरुणी नोकरीपासून वंचित राहिल्या.त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आणि आता नव्याने नोकरीला जाणारे तसेच शिक्षणासाठी जाणाऱ्या व्यक्ती समोर एसटी संपाचे संकट उभे राहिले.एस टी बस फेरी बंद झाल्याने मोठ्या प्रमाणात या लोकांचे अतोनात हाल झाले.यामुळे काही जणांना नोकरी मिळूनही जाता येत नसल्याने त्यांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. तसेच विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसानही झाले. एस टी बस फेऱ्या सुरू झाल्या असत्या तर त्यांना दिलासा मिळाला असता.आता काही ठिकाणच्या एसटीच्या बस फेऱ्या सुरू झाल्या आहेत.मात्र वेगुर्ल्याहुन गोव्याला जाणारी एक ही एस बस फेरी सुरू झाली नाही. यामुळे वेंगुर्ला आगाराची एसटी बस फेरी बंद असल्याने गोव्यात जाणार्या नोकरदार,रुग्ण व विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याची समस्या काही जणांनी हेमंत मराठे यांच्याकडे मांडल्यानंतर मळेवाड कोंडूरे उपसरपंच हेमंत मराठे यांनी तात्काळ वेंगुर्ला स्थानक प्रमुख वारंग यांच्याशी संपर्क साधून वेंगुर्ला पणजी बस फेरी तात्काळ सुरू करा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.