शिक्षक भारतीचा वैभववाडी तालुक्याचा “नारीशक्ती पुरस्कार” नाधवडेतील सौ.श्रावणी सतीश मदभावे यांना सन्मानपूर्वक प्रदान

शिक्षक भारतीचा वैभववाडी तालुक्याचा “नारीशक्ती पुरस्कार” नाधवडेतील सौ.श्रावणी सतीश मदभावे यांना सन्मानपूर्वक प्रदान

*कोकण Express*

*शिक्षक भारतीचा वैभववाडी तालुक्याचा “नारीशक्ती पुरस्कार” नाधवडेतील सौ.श्रावणी सतीश मदभावे यांना सन्मानपूर्वक प्रदान!*

*कासार्डे ः  संजय भोसले*

८ मार्च विश्व महिला दिनाचे औचित्य साधून शिक्षक भारती सिंधुदुर्गच्या वतीने जिल्ह्यातील स्त्री शक्तीचा सन्मान करण्यात आला. यावेळी वैभववाडी तालुक्यातील नाधवडे गावच्या सौ. श्रावणी सतीश मदभावे यांचा शैक्षणिक,सामाजिक व व्यसनमुक्ती क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल गौरव करण्यात आला.

शिक्षक भारतीच्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याला वैभववाडीचे ज्येष्ठ नागरिक स्वातंत्र्य सेनानी कॅप्टन श्री.जे.के.रावराणे,सौ. रावराणे,सिनिअर कॉलेज वैभववाडीचे प्रा.एस. एन.पाटील,प्रसिद्ध लेखक कवी श्री.प्रमोद कोयंडे, चित्रकार व पत्रकार उदय दुदवडकर, दै.लोकमतचे पत्रकार तसेच हस्ताक्षर संग्राहक निकेत पावसकर, शिक्षक भारती सिंधुदुर्गचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नाधवडे हायस्कूलचे मुख्याध्यापक डी.एस.पाटील, शिक्षक भारती वैभववाडीचे तालुकाध्यक्ष अविनाश कांबळे, उपाध्यक्ष संदिप तूळसकर, सचिव स्वप्नील पाटील, संघटक रामचंद्र घावरे, संघटनेचे धडाडीचे व जेष्ठ सदस्य पुरीबुवा, ए.बी. जाधव, सदस्य दीपक कुवर , संजय तुळसकर, सदस्या पालकर मॅडम, पार्वती मदभावे, श्रावणी कम्प्युटर्सचे मार्गदर्शक सतीश मदभावे आदि उपस्थित होते. सन्माननीय सौ. श्रावणी मदभावे यांचा कोकिसरे हायस्कूलच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ.पालकर मॅडम आणि सौ.नेहा रावराणे मॅडम यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.डी. एस.पाटील यांनी केले न तर स्वप्नील पाटील यांनी पुरस्काराबद्दल माहिती विशद करीत सत्कारमूर्तीं श्रावणी मदभावे यांच्या कार्याची माहिती करून दिली व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

पुरस्कारासाठी निवड करून हा मानाचा पुरस्कार आपल्या पत्नीला सन्मानपूर्वक प्रदान केल्याबद्दल सतीश मदभावे यांनी शिक्षक भारतीचे विशेष आभार मानून सर्वांना धन्यवाद दिले.तर सत्कारमूर्ती श्रावणी मदभावे यांनी शिक्षक भारती संघटनेने दिलेला हा पुरस्कार आपला एकटीचा नसून कार्यात सहभाग दिलेल्या सर्वांचाच आहे प्रतिपादन केले. हा पुरस्कार आपलं कार्य अधिक पुढे नेण्यासाठी प्रेरणास्त्रोत ठरेल अशी भावूक प्रतिक्रियाही श्रावणी मदभावे यांनी अभिव्यक्त केली. उपाध्यक्ष संदीप तुळसकर यांनी उपस्थित सर्व मान्यवरांचे तसेच देवगड तालुक्याचे शिक्षक भारतीचे जेष्ठ कार्यकर्ते व जिल्हा कार्यकारिणी सदस्य उदयसिंह रावराणे यांचे आभार मानले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री.उदयसिंह रावराणे सरांचे विशेष सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!