*कोकण Express*
*तळेरे येथे महिलांना आरोग्य व कायदेविषयक मार्गदर्शन : विविध कर्तुत्ववान महिलांचा गौरव*
*कासार्डे ः संजय भोसले*
महिला दिनाचे औचित्य साधून महिलांना आरोग्य व कायदेविषयक माहिती मिळण्यासाठी सखी वन स्टॉप सेंटर, सिंधुदूर्ग यांचा चर्चा सत्राचे आयोजन श्री गणेश प्लाझा, तळेरे बाजारपेठ येथे करण्यात आले होते. यावेळी विविध कर्तुत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला.
तळेरे व कासार्डे येथील महिलांसाठी हा कार्यक्रम सौ. विधी वैभव मुद्राळे यांनी आयोजित केला होता. यावेळी सखी वन स्टॉप सेंटर च्या सेंटर ॲडमिनिस्ट्रेटर ॲड पूजा काजरेकर यांनी सखी वन स्टॉप सेंटर बद्दल माहिती दिली. तसेच पॅरा मेडिकल स्टाफ स्नेहा मोरे यांनी ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर व सर्वाइकल कॅन्सर याबद्दल माहिती दिली. केस वर्कर चैत्राली राहुल यांनी किशोरवयीन मुली व आईची भूमिका याबद्दल, केस वर्कर ॲड मीनाक्षी नाईक यांनी स्त्री पुरुष समानता व स्त्री भ्रूण हत्या याबद्दल विशेष मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या आयोजिका सौ विधी वैभव मुद्राळे यांनी महिला दिनाचे महत्त्व व समाजात महिलांचे योगदान याबद्दल मनोगत व्यक्त केले.
यावेळी डॉ. सौ. नीलिमा सुहास पिसे, सौ. साक्षी शैलेश सूर्वे, सौ. श्रावणी सतीश मदभावे, कु. स्वप्नाली शिवदास कदम, कु. मृण्मयी विजयानंद गायकवाड, सौ. विधी वैभव मुद्राळे यांना सखी वन स्टॉप सेंटर सिंधुदुर्ग यांच्या वतीने उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. सखी वन स्टॉप सेंटर च्या सल्लागार ॲड रूपाली प्रभू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार मानले. तसेच सौ. विधी वैभव मुद्राळे यांनी कार्यक्रम आयोजन केलाय बद्दल सखी वन स्टॉप सेंटर तर्फे त्यांचे आभार मानले. या कार्यक्रमा मुळे महिलांना कायदेविषयक व आरोग्यविषयक माहिती मिळाली व एका वेगळ्या पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. तळेरे व कासार्डे परिसरातील महिलांनी उपस्थित राहून छान प्रतिसाद दिला.