*कोकण Express*
*सर्विसिंग सेंटर च्या रॅम्पवरील कार घुसली थेट दुकान गळ्यात*
कणकवली शहरातील एका सर्विसिंग सेंटरवर वॉशिंग करण्यासाठी लावलेली इर्टीगा कार सर्विसिंग सेंटर च्या कर्मचाऱ्याने स्टार्ट केली अन कार रॅम्प वरून थेट सर्विसिंग सेंटर च्या गाळ्यात जाऊन धडकली. अगदी पिक्चर स्टाईल घडलेल्या या प्रकाराने मात्र बघ्यांची तेथे एकच गर्दी जमली. कणकवली नरडवे रोडवर असलेल्या एका सर्विसिंग सेंटरवर एक इर्टीगा कार वॉशिंग साठी लावण्यात आली होती. सर्विसिंग सेंटर च्या रॅम्पवर ही कार उभी असताना सर्विसिंग सेंटरच्या कर्मचाऱ्याने काही कारणाकरिता कार स्टार्ट केली. मात्र ती कार वेगाने रॅम्प वरून सुमारे तीन फूट खाली जात थेट लगत असलेल्या सर्विसिंग सेंटर च्या गाळ्या च्या भिंतीला जाऊन धडकली. या प्रकाराने मात्र तेथे असलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. या प्रकाराने कारचे नुकसान झाले असून ती कार दुकान गळ्यातून बाहेर काढण्यात आली. सायंकाळी साडेचार वाजता घडलेल्या या प्रकाराने मात्र तेथे असलेल्या लोकांची एकच धावपळ उडाली. या प्रकाराने कारचे नुकसान झाले असून ती कार दुकान गळ्यातून बाहेर काढण्यात आली.

