आंबोली येथे कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

आंबोली येथे कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी

*कोकण Express*

*आंबोली येथे कार नाल्यात कोसळल्याने अपघात, कर्नाटकातील तिघे गंभीर जखमी*

*आंबोली ः प्रतिनिधी*

चालकाचा अंदाज चुकल्याने येथील मुळवंदवाडी परिसरातील नाल्यात दहा ते बारा फुट खोल कार कोसळल्याचा प्रकार रात्री घडला. या अपघातात कर्नाटक येथील तिघे जखमी झाले आहेत. हा अपघात काल रात्री घडला. जखमींना अधिक उपचारासाठी अन्यत्र हलविण्यात आले आहे.

यात तिघे जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना येथील रमेश तावडे, शिवसेनेचे उपविभाग प्रमुख उत्तम पारधी यांनी मदत केली. यानंतर १०८ रुग्णवाहिका बोलावून आंबोली आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. बेळगाव येथून गोव्याकडे जात असताना रात्री अपघात घडला. मात्र जखमींची नावे समजू शकली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!