*कोकण Express*
*तळेरे जी.प.चे शिक्षक सत्यवान चव्हाण यांना राष्ट्रीय पुरस्कार जाहीर*
*कासार्डे ः संजय भोसले*
जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा तळेरे नंबर 1 या शाळेतील उपक्रम शील शिक्षक सत्यवान शांताराम चव्हाण यांना तेजस्विनी शिवमल्हार संस्था रत्नागिरी यांनी आयोजित केलेल्या गौरव साहित्य संमेलनात कर्तुत्वाचा जीवन प्रतिभेने प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाची ओळख, यश कीर्तीच्या कृतार्थतेची ऐतिहासिक नोंद, व कृतीशील गुणवत्तेच्या सर्वश्रेष्ठ सन्मान सोहळ्यात *नॅशनल स्टार पर्सनॅलिटी अवार्ड* या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या पुरस्कारामुळे तळेरे नंबर १ शाळेचे नाव उंचावले आहे .
या त्यांच्या कार्यामुळे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जाधव ,माता पालक संघ, पालक-शिक्षक संघाचे सर्व पदाधिकारी, सन्माननीय माजी सभापती श्री दिलीप तळेकर, तळेरे प्रभागाचे विस्तार अधिकारी सुहास पाताडे ,केंद्रप्रमुख गोपाळ जाधव ,मुख्याध्यापिका श्रीमती पद्मजा करंदीकर व सर्व शिक्षक वृंद आणि तळेरे पंचक्रोशीतील ग्रामस्थ यांचेमार्फत असे गुणी व उपक्रमशील शिक्षक असलेले सत्यवान चव्हाण यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

