मनसे कुडाळ तालुकध्यक्ष पदी प्रसाद गावडेच

मनसे कुडाळ तालुकध्यक्ष पदी प्रसाद गावडेच

*कोकण Express*

*मनसे कुडाळ तालुकध्यक्ष पदी प्रसाद गावडेच..*

*तालुक्यातील पदाधिकऱ्यांचा एकमुखी ठराव..*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

काल दि.१०-०३-२०२२ रोजी धीरज परब यांनी वरिष्ठांना कोणतीही कल्पना न देता बेकायदेशीर व मनमानीपणे बैठक घेत कुडाळ तालुक्यातील पक्ष संघटना पदसंरचनेत हस्तक्षेप करून पक्ष शिस्त मोडीत काढत वृत्त पत्रांद्वारे प्रसाद गावडे यांचे पद गोठवत असल्याच्या बातम्या छापून आणल्या होत्या.कालच्या प्रकारानंतर मनसेचे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी पक्षाचे नेते शिरीष सावंत यांच्याशी संपर्क करत झालेल्या प्रकाराचे दखल घेण्याचे विनंती केली होती त्यावर पद घोटण्याचे अधिकार माननीय राज साहेबांचे असून आपण आपले काम करत राहा असे आदेश प्रसाद गावडे यांना दिले होते त्यानुसार आज कुडाळ तालुक्यातील पदाधिकऱ्यांनी याची त्वरित दखल घेत उत्फुर्तपणे एकत्र येण्याचा निर्णय घेवून विशेष बैठक आयोजित केली होती.सदर बैठकीस पक्षाचे

उपतालुकाध्यक्ष,विभागअध्यक्ष,उपविभाग अध्यक्ष,शाखाध्यक्ष तसेच सरपंच,ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.शिवाय जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हा सचिव श्री.बाळा पावसकर व मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर हे देखील उपस्थित होते.सदर बैठकीत एकमताने तालुकाध्यक्ष वा इतर पक्ष संघटनेत जिल्हाध्यक्षांनी मनमानीपणे केलेले बदल हे अनधिकृत ठरवण्यात आले असून अमान्य करण्यात आले आहेत. शिवाय त्याचा कुडाळ तालुका कार्यकारिणीशी काहीही संबंध नाही अशा आशयाचे ठराव संमत करत कुडाळ तालुकाध्यक्षपदी प्रसाद गावडे हेच असून त्यांच्याच नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे बैठकीत एक मुखाने ठरवण्यात आले. शिवाय बैठकीचे ठराव पक्षाचे नेते सरचिटणीस यांचेकडे देखील माहितीसाठी पाठवण्यात आलेले आहेत एकंदर मनसे अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आली असून कुडाळ तालुकाध्यक्ष पदा बाबतीत नवीन ट्विस्ट पाहावयास मिळाला आहे. सदरच्या बैठकीदरम्यान जिल्हाध्यक्ष धीरज परब व त्यांच्या निवडक समर्थकांनी धुडगूस घालण्याचा प्रयत्न केला मात्र सर्व पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने निर्णय घेतल्याने मनसे तालुकाध्यक्षपदी प्रसाद गावडे हेच राहणार असल्याचे बैठकीत अंतिम झाले आहे.सदर बैठकीस बाळा पावसकर, कुणाल किनळेकर,बाबल गावडे,अणाव सरपंच आपा मांजरेकर,उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे,बाळकृष्ण ठाकूर,सत्यविजय कवीटकर,अविनाश अणावकर, विभाग अध्यक्ष रामा सावंत,सुंदर गावडे,श्रीपाद अडसुळे,गणपत परब,सचिन ठाकूर, उप विभाग अध्यक्ष विष्णू म्हस्के,दत्तात्रय गावडे,गुरू मर्गज,रमाकांत नाईक,प्रमोद परब अब्राव फर्नांडिस,वैभव धुरी,ओंकार मेस्त्री गजानन राऊळ, ऋतिक ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आता पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर नेमका काय निर्णय घेतला जातो याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!