*कोकण Express*
*एडगांव येथे शहीद विजय साळसकर यांना आदरांजली*
*वैभववाडी ः प्रतिनिधी*
26/11च्या मुंबईतील दहशतवादी हल्यात शहीद झालेले तालुक्यातील एडगावचे सुपुत्र विजय साळसकर यांना स्थानिक ग्रामस्थ व अर्जुन रावराणे विद्यालय यांच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. एडगांव येथील शहीद विजय साळसकर स्मारक या ठिकाणी उभारण्यात आलेल्या त्यांच्या पुतळ्याला उपस्थीतांनी पुष्पहार अर्पण केला. अमर रहे, अमर रहे, विजय साळसकर अमर रहे. या घोषणेने ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी परिसर दणाणून सोडला.
यावेळी वैभववाडी तालुका शिक्षण संस्थेचे अधिक्षक जयेंद्र रावराणे, पोलीस निरीक्षक अतुल जाधव, वैभववाडी उपनगराध्यक्ष रोहन रावराणे, मुख्याध्यापक बी. एस. नादकर, माजी सरपंच प्रमोद रावराणे, सुनिल रावराणे, दत्ताराम आकाराम रावराणे, गोविंद रावराणे’ पोलिस पाटील प्रसाद रावराणे, विनोद रावराणे, एडगाव ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.