अपर्णा पारकर, आदिती कदम यांना आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार प्रदान

अपर्णा पारकर, आदिती कदम यांना आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार प्रदान

*कोकण  Express*

*अपर्णा पारकर, आदिती कदम यांना आदर्श अंगणवाडी सेविका व मदतनीस पुरस्कार प्रदान*

*कासार्डे  ः संजय भोसले*

महिला व बालविकास विभागाकडून कासार्डे गावातील सौ. अपर्णा अंकुश पारकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका तर सौ. आदिती अजय कदम यांना आदर्श मदतनीस पुरस्कार प्राप्त झाला.

जागतिक महिला दिनाच्या औचित्यावर जिल्हा परिषद सिंधुदुर्ग महिला व बालविकास विभागाकडून जिल्ह्यातील केंद्रस्तरीय आदर्श अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी सेविका आणि पर्यवेक्षिका पुरस्कार वितरित करण्यात आले. एकात्मिक बालविकास सेवा योजना क्षेत्रात उत्कृष्ट आणि प्रशंसनीय कार्य केल्याबद्दल हे पुरस्कार वितरित करण्यात आले. कासार्डे प्रभागातील कासार्डे – साटमवाडी अंगणवाडीच्या सौ. अपर्णा अंकुश पारकर यांना आदर्श अंगणवाडी सेविका आणि सौ. आदिती अजय कदम यांना आदर्श मदतनीस पुरस्काराने गौरविण्यात आले.

देशाची भावी पिढी घडविण्याचा पायंडा अंगणवाडी मध्ये असतो. ओल्या मातीला आकार देण्याचे कार्य अंगणवाडीमध्ये केले जाते. लहान मुले ही ओल्या मातीचा गोळा असतात आणि त्यांना घडविण्याचे कार्य अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्याकडून होत असते. रक्ताचे नाते नसतानाही आईच्या वात्सल्याने, ममतेने लहान मुलांना घडविण्याचे महान कार्य अंगणवाडी सेविका – मदतनीस करत असतात.

सदर पुरस्कार शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष संजना सावंत, जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, महिला व बालकल्याण विभाग अधिकारी श्री. रसाळ, पराडकर यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार सोहळा पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!